श्री छत्रपती कारखान्यात नवीन मिलचे रोलर पूजन

भवानीनगर- भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या नवीन मिलचे रोलर पूजन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखाण्याच्या नवीन विस्तार वाढ कारखान्याच्या मिलचे रोलर पूजन शनिवारी (दि.26) सकाळी 11 वाजता इंदापूर तालुक्‍याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत काटे, संचालक प्रदीप निंबाळकर, ऍड. लक्ष्मण शिंगाडे, ऍड. रणजीत निंबाळकर, राजेंद्र गावडे, अमोल पाटील, दत्तात्रय सपकळ, अनिल बागल, अभिजित रणवरे, निवृत्ती सोनवणे, कार्यकारी संचालक जी. एम. अनारसे, वर्क्‍स मनेजर अनिल वाबळे चीप केमिस्ट ए. आर. खाडे, सचिव अशोक मोरे, मुख्य शेतकीअधिकरि अनिल राऊत, प्रभारी सिविल इंजिनिअर नंदकुमार चांदगुडे, सुरक्षा अधिकारी दत्तात्रय पिसे आदी उपस्थित होते. यावर्षीचे गळीत हंगामाकरिता कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील एकूण 10 लाख मे.टन ऊस गळीतासाठी उपलब्ध असून विस्तारवाढीसह संचालक मंडळाने प्रतिदिनी सरासरी साडेसात ते आठ हजार मे.टन ऊसाचे गाळप करणेचे उद्दिष्ट ठरविले आहे. त्याप्रमाणे उसतोडणी वाहतूक यंत्रणेची जुळवाजुळव केलेली आहे. त्याचप्रमाणे सध्यस्थितीत कारखान्यातील मशीनरी ओव्हरओइलिंग कामे सुरू असून नियोजित वेळेत विस्तार वाढीसह कारखाना सुरू करण्याचे नियोजन केलेले असल्याचे माहिती कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)