श्री छत्रपती कारखान्यात तणाव

लेबर ऑफिसरची सिक्‍युरीटी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ : संचालकांची मध्यस्ती

भवानीनगर – श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे लेबर ऑफिसर यांनी कारखान्यातील सिव्हिलमध्ये सिक्‍युरिटीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरल्याने काही वेळ कारखान्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु काही संचालकांनी मध्यस्ती केल्याने हा वाद मिटला.
श्री छत्रपती कारखान्यातील सिक्‍युरिटी विभागात सिव्हीलमध्ये काम करणारे दोन कर्मचारी कामाला लागताना कारखान्यातील लेबर ऑफिसर यांनी या दोन कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरल्याने येथील सर्वच सिक्‍युरीटमध्ये सिव्हीलमध्ये काम करणारे 31 जणांनी या घटनेचा संताप व्यक्‍त करीत कारखान्यातील कार्यालयाच्या बाहेर ठिय्या मांडून जोपर्यंत या लेबर ऑफिसरवर कारवाई होत नाही आणि आम्हाला कारखान्यात कायम करत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, अशी भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
साधारण अडीचच्या सुमारास कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, संचालक प्रशांत काटे, रणजित निंबाळकर, राजेंद्र गावडे, कार्यकारी संचालक गोविंद अनारसे हे याठिकाणी आले असता येथील बसलेल्या सिक्‍युरीटमधील सिव्हीलमध्ये काम करणाऱ्या सर्वाना सांगितले की, मंगळवारी (दि. 11) कारखान्याच्या अध्यक्षपदाची व उपाध्यक्षपदाची निवड होणार आहे. त्यानंतर तातडीने सर्व संचालक मंडळाची मिटिंग घेऊन तुमचे जे प्रश्‍न आहेत ते मार्गी लावण्याचा नक्की प्रयत्न करू कारखान्याला व सभासदांना वेठीस धरून कोणताही उपयोग होणार नाही. संचालक मंडळाने जे काही सिक्‍युरीटमधील सिव्हीलमध्ये काम करीत असतील त्यांचे प्रश्‍न नक्की मार्गाला लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्याने सर्व कामगार कामावर हजर झाले.

  • कारखाना आपला आहे कारखाना वाचला पाहिजे व कारखाना कर्जातून बाहेर पडला पाहिजे हीआमचीही सर्व सिव्हीलमधील सिक्‍युरिटी म्हणून काम करणाऱ्या कामगारांची भूमिका आहे. त्यासाठी आम्ही दोन, दोन पाळ्या करण्यासही तयार आहोत. मात्र आम्ही गेली 10 ते 15 वर्षे सिव्हीलमध्ये काम करीत आहोत, आम्हाला कारखान्यात कायम करून घ्यावे. येत्या शनिवार (दि. 15) पर्यंत जर आमच्या 31 सिव्हील सिक्‍युरिटीमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा विचार संचालक मंडळाने केला नाही तर आम्ही आत्मदहन करणार आहोत.
    – बापूराव कोकरे, सिव्हील सिक्‍युरीटी कामगार 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)