श्री चिन्नाप्पा स्वामी स्मरणदिन उत्साहात

शिवापूर मध्ये मिरवणूक; भाविकांचा उस्फुर्त प्रतिसाद
खेड शिवापूर  – शिवापूर (ता.हवेली) येथील श्री चिन्नाप्पा स्वामी स्मरण दिन ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढून उत्साहात साजरा करण्यात आला.
वीरशैव समाजातील काही पदाधिकाऱ्यांनी 24 वर्षांपूर्वी गावातील पश्‍चिमेच्या बाजूला स्वामींचा मठ बांधला आहे. तेथे स्वामींची संजीवनी समाधी बांधण्यात आली आहे. दरवर्षी पुण्यस्मरण दिवशी पालखी मिरवणूक काढून उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. याही वर्षी सकाळी 10 पासून ढोल पथकांमुळे शिवापूर परिसर दुमदुमून गेला होता. पालखी मठामध्ये स्थिरावल्यानंतर श्रींना अभिषेक घालण्यात आला, त्यानंतर महाप्रसाद देण्यात आला. प्रथमच महिला ढोल पथकाने कार्यक्रमात भाग घेतला असल्याने वीरशैव संस्थेचे अध्यक्ष सुभाष मिठारे यांनी महिलांचे कौतुक केले. पुढील वर्षी मठाला 25 वर्ष पूर्ण होत असल्याने कार्यक्रम खूप मोठा करणार असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष व हॉटेल कैलास भेळचे मालक सुभाष मिठारे, हॉटेल न्यू विलासचे मालक सुनील वनपत्रे, मा.अध्यक्ष पोपट रेडे, संस्थेचे उपअध्यक्ष संजय सट्टे, प्रकाश रेडे, अशोक मल्हारे, दिलीप सट्टे, ग्रामीण महिला ढोल पथकाच्या अध्यक्षा पल्लवी दिघे, किरण सट्टे, मंडळाचे माजी अध्यक्ष दादा रेडे, शुभांगी प्रकाश रेडे, दिपस्वी शेटे, जगन्नाथ लांडगे, संजय मल्हारे, वसंत वनपत्रे, हेमंत रेडे, शिवदास गुळवे, विशाल रेडे, विठ्ठल कुताडे, सोमनाथ सट्टे, मंडळाचे अध्यक्ष राजु सट्टे, ग्रामस्थ तसेच महिलांचा सहभाग लक्षणीय होता, तसेच परिसरातील वीरशैव समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)