श्री घाटजाई पतसंस्थेने आपुलकीचे नाते निर्माण केले

पाचगणी ः वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना नानासाहेब कासुर्डे शेजारी मान्यवर.

पाचगणी, दि. 10 (प्रतिनिधी)- श्री घाटजाई पतसंस्थेने शहरातील सर्वसामान्य घटक, व्यापारी, छोटे मोठे उद्योजक याना आर्थिक सक्षम करून सभासद आणि पाचगणीकरांमध्ये आपुलकीचे नाते निर्माण केले असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष व श्री घाटजाई नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब कासुर्डे यांनी केले.
पाचगणी, ता.महाबळेश्वर येथील श्री घाटजाई पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कासुर्डे बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष रमेश खरात, संस्थेचे संचालक जगन्नाथ शिंदे, किरण जानकर, अंजना चौरसिया, प्रतिभा कासुर्डे, विजय कासुर्डे, तानाजी भिलारे, सूर्यकांत गोळे, दीपक कळंबे, अविनाश माने, दिलीप टेके, सरव्यवस्थापक सखाराम कासुर्डे, दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष विजय रांजणे आदी मान्यवर उपस्थित होते.
जगन्नाथ शिंदे म्हणाले, संस्थेवरील निष्ठा, ठेवी आणि कर्ज यावरच कुठलीही संस्था यशस्वी होत असते. घाटजाई पतसंस्थेने अल्पावधीत विश्वासनीय कारभार, पारदर्शक व्यवहार यामुळे सातत्याने अ वर्ग प्राप्त करून सभासदांच्या मनात वेगळा विश्वास निर्माण केला आहे. दीपप्रज्वलनाने सभेस प्रारंभ झाला. अहवालवाचन सखाराम कासुर्डे यांनी केले. नफा- तोटा पत्रकचे व्यवस्थापक नितीन बेलोशे यांनी वाचन केले. यावेळी योगेश मालुसरे, यशवंत पार्टे, फिरदोस शेख, कल्याणी कांबळे, विजय कासुर्डे तसेच बहुसंख्य सभासद उपस्थित होते. नानासाहेब कासुर्डे यांनी स्वागत केले तर जगन्नाथ शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश खरात यांनी आभार मानले.

 


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)