श्री गणेशाच्या सजावटीचा खेळ मांडियेला

साताऱ्यातील पाठकजी कुटुंबियांनी साकारला क्रीडागणेश
सातारा:प्रतिनिधी
दरवर्षी गणेशोत्सवात श्री गणेशाच्या सजावटीसाठी वेगळी कल्पना लढवणाऱ्या साताऱ्यातील पाठकजी कुटुंबियांनी यावर्षी क्रीडा विषयवार आधारित खेळ मांडियेला हा देखावा उभरला आहे.हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
याबाबत बोलताना पद्माकर पाठकजी म्हणाले,ज्ञानगणेश आणि संगीत गणेश या सलग दोन वर्षांच्या सजावटीनंतर यंदाही काही तरी वेगळी थीम घेऊन सजावट करण्याचा विचार सुरू होता. रशियात यंदाच्या वर्षी झालेला फुटबॉल विश्वचषक, जकार्तामध्ये नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा यांच्या पार्श्वभूमीवर क्रीडा गणेश साकारण्याची कल्पना काही महिन्यांपूर्वी सुचली आणि मग आम्ही सगळेच कामाला लागलो. घरात सध्या कोणीही चॅम्पियन नसताना, क्रीडा संस्कृतीचे वातावरण नसतानाही हा विषय एक आव्हान म्हणून मांडायचे निश्‍चित केले.
पाठकजी कुटुंबियांनी त्यानंतर बैठ्या, मैदानी, साहसी अशा विविध क्रीडा प्रकारांचे साहित्य गोळा करण्याचे ठरवले. त्यात सारीपाट, लगोरीपासून ते अगदी दांडपट्टा, ढाल तलवारीपर्यंत आणि सापशिडी, कॅरम, बुद्धिबळापासून ते क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, गोल्फपर्यंत खेळांचं साहित्य गोळा केलं. जे खेळ कोणत्याही साहित्याशिवाय खेळले जातात. त्यांच्या छोट्या प्रतिकृती केल्या. काही पारंपरिक खेळांची चित्रही काढून घेतली. सजावटीच्या पार्श्वभूमीसाठी मैदान गाजवणाऱ्या भारतीय खेळाडूंची छायाचित्रेही कोलाज करून वापरण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे लोगो, शुभंकर यांचा वापर असलेली पृथ्वीही या सजावटीत समाविष्ट केली. सजावटीला पूरक म्हणून क्रीडाविषयक पुस्तके, क्रीडाविषयक चित्रपटांची पोस्टर्स, जुनी नियतकालिके, वृत्तपत्रांचे अंक असं सारं काही विविध ठिकाणहून गोळा केलं. निवडक खेळांच्या माहितीचे एकत्रीकरणही केले आणि या सजावटीच्या निमित्ताने क्रीडा संस्कृती जपणाऱ्या साताऱ्यातील महत्त्वाच्या संस्थांची नोंदही घेतली.
ही सजावट 21 तारखेपर्यंत सदाशिव पेठ, खण आळी सातारा येथे पाहता येउ शकेल अशी माहिती पद्माकर पाठकजी यांनी दिली
चौकट
विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साताऱ्यातील खेळाडूंची यादीही अथक प्रयत्नांनी तयार केली.क्रीडा या क्षेत्राचा विस्तार प्रचंड असल्यामुळे सर्व गोष्टींचा समावेश त्यात करण्यात आलेला नाही, काही महत्त्वाच्या खेळांची माहिती, साहित्य जमा करणे शक्‍य झाले नाही. जागेच्या आणि इतर मर्यादा होत्याच. तरीही ही सजावट परीपूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या अथक प्रयत्नांतून क्रीडा गणेश साकारला अशी माहिती पद्माकर पाठकजी यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)