श्री गजानन महाराजांचा संजीवन समाधी सोहळा

अनिल देशपांडे ः भक्‍त मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
सातारा, दि. 11 (प्रतिनिधी) – येथील अर्कशाळानगर, शाहूपुरी येथील श्री गजानन महाराज मंदिरात श्रींच्या 108 व्या संजीवन समाधी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. 12 ते शुक्रवार, दि. 14 अखेर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री गजानन महाराज भक्‍त मंडळाचे अध्यक्ष अनिल देशपांडे यांनी दिली.
बुधवार, दि. 12 रोजी सकाळी 7 ते 8 श्री गणेश मूर्तीवर महाअभिषेक व षोडशोपचार पूजा, सकाळी 8 ते 11 शांतीपाठ. यामध्ये संकल्पपूर्वक नांदी श्राद्धांत पुण्याहवाचन, आचार्यवरण, सद्‌गुरु श्री गजानन महाराज व श्री गणेश पंचायतन स्थापन, षोडशोपचार पूजा, स्थापित देवता प्रीत्यर्थ, पवमान व पंचायतन सूक्‍त जप. सायंकाळी 7.30 ते 8 श्रींची महाआरती व नामस्मरण होणार आहे. गुरुवार, दि. 13 रोजी सकाळी 7 ते 8.30 श्रीगणेश चतुर्थी निमित्ताने श्रीगणेश मूर्तीवर पंचामृत महाअभिषेक, दुपारी 4 ते 5 शांतिपाठ, स्थापित देवता षोडशोपचार पूजा, सायंकाळी 5 ते 7 पुरुष वर्गाचा भजनी मंडळाचा कार्यक्रम, सायंकाळी 7 ते 7.30 सामुदायिक श्री गणेश अथर्वशीर्ष पठण, सायंकाळी 7.30 ते 8 श्रींची महाआरती व नामस्मरण. शुक्रवार, दि. 14 रोजी सकाळी 7 ते 8.30 श्रींच्या मूर्तीवर महाअभिषेक, आरती व नामस्मरण, सकाळी 8.30 ते 9 वा. श्रींच्या मूर्तीवर गुलाबपुष्पांचा वर्षाव करत गण गण गणात बोते या सिद्धमंत्राचा नामघोष, सकाळी 9 ते 11 वा. शांतिपाठ, स्थापित देवता षोडशोपचार पूजा, अग्नि स्थापना, नवग्रह स्थापना, नवग्रह होम, पंचायतन याग, पवमान याग, श्री दत्त याग, सिद्ध मंत्र हवन, मृत्यूंजय हवन, बलिदान पूर्णाहुती, अभिषेक, आशीर्वचन होणार आहे. सकाळी 11 वाजता श्री गजानन विजय ग्रंथातील 19 व्या अध्यायाचे सामुदायिक वाचन, दुपारी 12 ते 2.30 वा. महाआरती व प्रसाद, सायंकाळी 4.00 ते 5.30 वा. श्री गजान महाराज मंडळातील भगिनींचा भजनी मंडळाचा कार्यक्रम, सायंकाळी 6 ते 7 माऊली भजनी मंडळ करंजे यांचा हरिपाठाचा कार्यक्रम, रात्री 8.15 ते 9.15 “गीत गजानन’ हा श्री गजानन महाराजांच्या जीवनावरील आधारित मराठी भक्‍तीगीतांचा कार्यक्रम होणार आहे. या सर्व धार्मिक विधी वेदमूर्ती श्रीपाद शास्त्री जोशी व मंदार जोशी करणार आहे.
सर्व भाविक भक्‍तांनी दर्शनाचा व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन भक्‍त मंडळाचे अध्यक्ष अनिल देशपांडे यांनी केले आहे. गजानन महाराज भक्‍त मंडळाच्यावतीने वर्षातून चारवेळा भाविक भक्‍तांना श्रींचा महाप्रसाद दिला जातो. त्याकरीता मंडळाने एक हजार स्टीलची ताटे खरेदी करण्याचा संकल्प केलेला आहे. एका ताटाची किंमत 150 रुपये आहे. भाविक भक्‍तांनी ताटे खरेदी करण्यासाठी जास्तीतजास्त आर्थिक मदत करुन भक्‍त मंडळास सहकार्य करावे, अशी विनंती मंडळाकडून करण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)