सातारा- येथील अर्कशाळानगर, शाहूपुरी येथील श्री गजानन महाराज मंदिरात श्रींच्या 108 व्या संजीवन समाधी पार पडला. यावेळी अनेक भाविक भक्‍तांनी श्रींचे दर्शन घेतले.

वेदमूर्ती श्रीपाद शास्त्री जोशी व मंदार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 7 ते 8.30 श्रींच्या मूर्तीवर महाअभिषेक करण्यात आला. महाभिषेकानंतर आरती व नामस्मरण करण्यात आले. सकाळी 8.30 ते 9 वा. श्रींच्या मूर्तीवर गुलाबपुष्पांचा वर्षाव करत गण गण गणात बोते या सिद्धमंत्राचा नामघोष करण्यात आला. त्यानंतर सकाळी 9 ते 11 वा. शांतिपाठ, स्थापित देवता षोडशोपचार पूजा, अग्नि स्थापना, नवग्रह स्थापना, नवग्रह होम, पंचायतन याग, पवमान याग, श्री दत्त याग, सिद्ध मंत्र हवन, मृत्यूंजय हवन, बलिदान पूर्णाहुती, अभिषेक, आशीर्वचन इत्यादी धार्मिक विधी करण्यात आले.

सकाळी 11 वाजता श्री गजानन विजय ग्रंथातील 19 व्या अध्यायाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. यावेळी यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. दुपारी 12 ते 2.30 वा. महाआरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी गजानन महाराज मंडळाकडून 500 स्टीलची ताटे खरेदी करण्यात आली होती. त्या ताटातच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी 4.00 ते 5.30 वा. श्री गजान महाराज मंडळातील भगिनींचा भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी 6 ते 7 माऊली भजनी मंडळ करंजे यांचा हरिपाठाचा कार्यक्रम संपन्न झाला. रात्री 8.15 ते 9.15 “गीत गजानन’ हा श्री गजानन महाराजांच्या जीवनावरील आधारित मराठी भक्‍तीगीतांचा कार्यक्रम झाला. यावेळी भाविक या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित राहिले व कार्यक्रमाचा आनंद लुटला.

सर्व भाविकांच्या उत्तम सहकार्यामुळे गजानन महाराजांचा संजीवन समाधी सोहळा उत्तम प्रकार पडला असल्याचे भक्‍त मंडळाचे अध्यक्ष अनिल देशपांडे यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)