श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान श्रावण महिन्यातील यात्रेसाठी सज्ज..

करंजे- नीरा-बारामती महामार्गावर करंजेपूलपासून चार किलोमीटर अंतरावरील सौराष्ट्रातील प्रती सोमनाथ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बारामती तालुक्‍यातील श्री क्षेत्र सोमेश्वर मंदीर येथे दरवर्षी श्रावण महिनाभर यात्रा असते. या यात्रेनिमित्ताने मंदिर विश्वस्त आणि सभासदांची गुरुवारी (दि. 9) सर्वसाधारण सभा पार पडली. त्यामधे भाविकाना योग्यत्या सुविधा देण्याबाबत चर्चा झाली. सोमेश्वर देवस्थान समीतीचे अध्यक्ष विनोद भांडवलकर, सचीव सुनील भांडवलकर, विश्वस्त गणेश आळंदीकर, सोमनाथ भांडवलकर, प्रताप भांडवलकर, वैभव भांडवलकर, करंजेचे माजी सरपंच प्रकाश मोकाशी, अनंत मोकाशी, मोहन भांडवलकर यांच्यासह अनेक सभासद यावेळी हजर होते. मंदिरात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्यात आले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य सेवा, एसटी महामंडळाद्वारे जादा गाड्या, भाविकांसाठी भक्त निवास, प्रशस्त वाहनतळ, पिण्यासाठी पाणी आदी सुविधा भाविकांना येथे देण्यात येत आहेत.

  • फत वाहनतळ सुविधा
    श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकासाठी प्रथमच देवस्थानमार्फत मोफत वाहनतळ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीने अनाधिकृतपणे भाविकाकडून पैसे घेतल्यास आणि मंदिर कार्यालयात तक्रार आल्यास सबंधित व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहीती अध्यक्ष विनोद भांडवलकर,सचीव सुनिल भांडवलकर व विश्वस्त गणेश आळंदीकर यांनी दिली आहे. भाविकांच्या गाड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त, तसेच स्वयसेवक ठेवण्यात येणार आहेत. भाविकांनी देखील मंदिराच्या अधिकृत वाहनतळावरच वाहने लावावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)