श्री कडजाई माता पतसंस्थेतर्फे इंदोरी येथे वृक्षारोपण

इंदोरी : श्री कडजाई माता पतसंस्थेतर्फे वृक्षारोपण करताना संस्थेचे संस्थापक दशरथ आप्पा ढोरे, दिलीप ढोरे आदी उपस्थित होते.

इंदोरी, (वार्ताहर) – इंदोरी मावळ येथील श्री कडजाई माता पतसंस्थेतर्फे इंदोरी येथिल संत तुकाराम नगर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये आंबा, नारळ, चिकू, लिंब आदी फळ झाडे तसेच औषधी झाडांची लागवड श्री कडजाई माता पतसंस्थेतेने स्वखर्चातून केली आहे.

इंदोरी परिसरात श्री कडजाई माता पतसंस्थेमार्फत दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. या वेळी संस्थेचे संस्थापक दशरथ आप्पा ढोरे, पतसंस्थेचे चेअरमन प्रियंका काशिद, इंदोरी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष दिलीप ढोरे , व्हाईस चेअरमन मंदाकिनी पवार, संतोष काशिद, तसेच संचालक कृष्णा पिंजण, महेश चव्हाण इंदोरी ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)