श्रीसमर्थ शिक्षण संस्थेचे स्नेहसंमेलन उत्साहात

चिंबळी-लहान वयापासून मुलांच्या विविध कलागुणांना वाव मिळाला पाहिजे, म्हणून श्रीसमर्थ इंग्लिश मेडियम स्कूल व कॉलेजच्या वतीने दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येत असल्याचे स्कूलचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे यांनी सांगितले.
खेड तालुक्‍यात ग्रामीण भागात असलेल्या श्रीसमर्थ शिक्षण प्रसार मोई संचालित खराबवाडी व केळगाव (ता. खेड) येथील श्रीसमर्थ इंग्लिश मेडियम स्कूल व कॉलेजच्या वतीने शुक्रवारी (दि. 22) भोसरी येथे अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा शुभारंभ सरस्वती प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाला. स्कूलचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे सचिव विद्या गवारे प्राचार्य अनिता टिळेकर यांच्या हस्ते प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी खराबवाडी येथील स्कूलच्या प्राचार्य विद्या पवार, कोमल फलके, श्री समर्थ पतसंस्थेचे व्यवस्थापक अमोल गवारे, केळगांव येथील स्कूलच्या प्राचार्य ललिता बडदे, निखील कांबळे, सपना टाकळकर, विकास गुंड आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुलांनी हिंदी, मराठी गाणी, लोकगीते, कराटे, कवायत आयोजित करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. या सर्व लहान मुलांचे व शिक्षकांचे पालकांनी कौतुक व अभिनंदन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना व मार्गदर्शन करणारे वर्ग शिक्षक यांना प्रमाणपत्र ट्रॉफी व विविध बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षिका कर्मचारी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)