चिंबळी- लहान वयापासून विद्यार्थ्यांवर भारतीय संस्कृतीचे संस्कार व्हावेत, या हेतूने चिंबळी फाटा (ता. खेड) येथील श्रीसर्मथ इंग्लिश मीडियम स्कूल व कॉलेच्या विविध उपक्रम आयोजित केले जातात. म्हणूनच दर वर्षी दहीहंडीचा सण शाळेत उत्साहात साजरा केला जातो. यंदाही शाळेतील विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षकांनी कृष्णगीतांवर फेर धरून नृत्य केले, अशी माहिती प्राचार्य अनिता टिळेकर यांनी सांगतिले. बच्चेकंपनी राधा-कृष्णाच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये नटूनथटून आली होती. मुलींच्या टिपरीनृत्याने कार्यक्रमाची शोभा वाढली. गोविंदांनी भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला. तर विद्यार्थ्यांनी थरांवर थर लाऊन हंडी फोडली. कोणताही उपक्रम असला तरी पालकांचे भक्कम पाठबळ मिळते. दहीहंडीच्या कार्यक्रमातही नेहमीच त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सर्व पालकांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला. दहीहंडी सजावट, बांधणी, प्रसाद बनविणे या सर्व कामांत पालकांनी सक्रिय भाग घेतला. पालक प्रतिनिधी यांनीही बालगोपाळांच्या या दहीहंडीसाठी मदत केली. याप्रसंगी स्कुल व कॉलेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे, सचिव विद्या गवारे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. तर या कार्यक्रमाचे आयोजन अजित थोरात, रत्नाकर वाघमारे, शोभा तांबे, स्नेहल विधाटे, वैशाली पटले व सर्व शिक्षकांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)