श्रीवाग्देव महाराजांचा दि. 20 रोजी रथोत्सव

 विद्युत रोषणाईमुळे चमकणारे वाग्देव महाराजांचे मंदिर. (छाया : जलालखान पठाण)

वाठार स्टेशनमध्ये विविध कार्यक्रम : आज पारायण सोहळ्याचे आयोजन

वाठार स्टेशन, 11 दि. (प्रतिनिधी)- वाठार स्टेशन येथील श्रीसमर्थ वाग्देव महाराज यांच्या 83 व्या पुण्यतिथीनिमित्त वाग्देव महाराज ट्रस्टच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दि. 12 रोजी ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे कलशपूजन सपोनि मारुती खेडकर यांच्या हस्ते व ध्वजपूजन उपकार्यकारी अभियंता (एमएसईबी) उत्तम मंचरे यांच्याकडून सकाळी 8 वाजता होणार आहे.
कार्यक्रमाचे व्यासपीठ अंकुश महाराज शेलार रा. आळंदी, चंद्रकांत लोंढे वाठार स्टेशन हे भूषविणार आहेत. यात्रेची तयारी धूमधडाक्‍यात सुरू असून वाग्देव महाराज ट्रस्टच्यावतीने मंदिरासाठी लागणारी विद्युत रोषणाई केली आहे. येथील परिसर स्वच्छ व निटनेटका केला आहे. मंदिरासाठी रंगरंगोटी केली आहे. विजेच्या रोषणाईमुळे मंदिर परिसराचा लखलखाट झाला आहे. पारायणासाठी पंचक्रोशीतील भाविक उपस्थित राहत असतात. येणाऱ्या भाविकांची नाश्‍ता दुपारचे जेवण, सायंकाळचे जेवण स्थानिक व परिसरातील अन्नदाते करीत असतात. पारायणाच्या सप्ताहाची जवाबदारी ट्रस्टच्या वतीने केली जाते. भला मोठा मंडप उभारला असून एकाच वेळेस चार ते पाच हजार भाविक बसतील, अशी सोय केली आहे. या सप्ताहात अनेक कीर्तनकारांचे किर्तन होत असते. कीर्तन ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक येत असतात. सामुदायिक पारायण सोहळा संपल्यानंतर काल्याचे किर्तन दि. 19 रोजी आयोजित केले आहे. रविवार दि. 20 वाग्देव महाराजांची रथयात्रा असून पंचक्रोशीतील भाविकांनी यात्रेसाठी उस्फूर्त हजेरी लावावी, असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)