श्रीलंकेमध्ये संसदेचे निलंबन मागे 

गुरुवारी राजपक्षे बहुमत सिद्ध करणार

विक्रमसिंघे यांना बहुमताचा आत्मविश्‍वास 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोलोंबो: श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपला सिरीसेना यांनी संसदेचे निलंबन मागे घेतले आहे आणि सोमवारी संसदेला सोमवारपासून पुन्हा निमंत्रित केले आहे. पंतप्रधान पदावरून हटवण्यात आलेले रनिल विक्रमसिंघे आणि सिरीसेना यांनी नियुक्‍त केलेले पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांच्यापैकी कोणाला बहुमत मिळणार, याचा निर्णय गुरुवारी होणार आहे. श्रीलंकेतील लोकशाही पुनर्स्थापित केली जाईल, असा विश्‍वास विक्रमसिंघे यांनी व्यक्‍त केला आहे.

सिरीसेना यांनी 16 नोव्हेंबरपर्यंत संसद स्थगित केली होती. मात्र संसदेला पुन्हा निमंत्रित करण्याबाबत त्यांच्यावर चहुबाजूंनी दबाव येऊ लागला होता. म्हणूनच अध्यक्ष सिरीसेना यांनी 5 नोव्हेंबर रोजी संसदेचे अधिवेशन बोलावले आहे, असे काही अधिकाऱ्यांनी सांगितले.

विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पार्टीला संसदेतील 106 सदस्यांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. तर राजपक्षे आणि सिरीसेना यांना मिळून 96 सदस्यांचे पाठबळ आहे. राजपक्षे यांना संसदेमध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी किमान 113 सदस्यांचे पाठबळ असण्याची आवश्‍यकता आहे. त्यांनी हे संख्याबळ जमा केले आहे की नाही, हे समजू शकलेले नाही. राजपक्षे यांनी आतापर्यंत विक्रमसिंघे यांच्या बाजूच्या 5 खासदारांना आपल्या बाजूला वळवण्यात यश मिळवले असल्याचे समजते आहे. त्यामुळे त्यांच्याबाजूला 101 सदस्य जमा झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)