श्रीलंकेने एलटीटीईच्या बुलेटप्रुफ नौका बुडवल्या

कोलंबो – श्रीलंकेच्या नौदलाने आज काही बुलेटप्रुफ नौका समुद्रामध्ये बुडवल्या. यामध्ये लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (एलटीटीई) या तामिळी दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाने यादवी युद्धाच्या काळात वापरलेल्या युद्धनौकेचाही समावेश आहे. या युद्धनौका आणि बुलेटप्रुफ नौका चुकीच्या व्यक्‍तींच्या हातात पडायला नको, यासाठी श्रीलंकेच्या नौ
“एलटीटीई’चा माजी उपप्रमुख विनयगामुर्ती मुरलीथरन आणि श्रीलंकेचे तत्कालिन अध्यक्ष जे. आर. जयवर्धने रानलसिंघे प्रेमदास, चंद्रिका कुमारतुंगा आणि महिंद्रा राजपक्षे यांच्या वापरातील लष्करी वहाने देखील काल सकाळी श्रीलंकेच्या पश्‍चिम किनारपट्टीजवळ बुडवून नष्ट करण्यात आली. या युद्धसामुग्रीचा लिलाव झाला असता, त्याचा गैरवापर होऊ शकला असता, म्हणून हे पाऊल उचलण्यात आले.

“एलटीटीई’च्या उर्वरित सदस्यांकडून या वाहनांचा आत्मघातकी हल्ल्यांसाठी वापर केला जाण्याचीही शक्‍यता आहे. वरिष्ठ नेत्यांच्या हत्येसाठी अशाच प्रकारच्या लष्करी वाहनांचा वापर करण्यात आला होता.माजी अध्यक्ष प्रेमदास यांच्या हत्येसाठीही असेच लष्करी वाहन वापरले गेले होते. कुमारतुंगा याही अशाच हल्ल्यातून बचावल्या होत्या. “एलटीटीई’साठी इंडोनेशिया आणि मलेशिया शस्त्रे आणणारी मालवाहू नौकाही बुडवून नष्ट करण्यात आली.

श्रीलंकेमध्ये तीन दशके चाललेल्या यादवी युद्धादरम्यान 20 हजार नागरिक बेपत्ता झाले, तर 1 लाख जण ठार झाले होते. “एलटीटीई’चा प्रमुख प्रभाकरन 2009 मध्ये मारला गेल्यावर हे युद्ध समाप्त झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)