कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेतील शंभरावर शहरांमध्ये सिगारेट्‌सवर बंदी घालण्यात आली आहे. अलीकडच्या काळात भारताच्या या शेजारी राष्ट्राने धूम्रपान आणि सिगारेटसची विक्री यांना आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. त्यापैकी ही एक आहे.

सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या संघटनेने तंबाखूच्या दुष्पपरिणांची स्थानिक लोकांना माहिती देण्यासाठी अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत, परिणामी अनेक व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी सिगारेट विकणे स्वेच्छेने बंद केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जाफनामधील 22, मतारामधील 17, कुर्नगेलामधील 16 शहरांसह इतर अनेक शहरांनी सिगारेट विक्रीवर बहिष्कार घातला आहे. सध्या एकूण 107 शहरे या मोहिमेत सामील झालेली आहेत. या बाबत समाधान व्यक्त करून आरोग्य मंत्री राजिता सेनारत्ने यांनी पुढील वर्षी अशा शहरांची संख्या 200 पेक्षाही अधिक होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

तंबाखूवरील करात 90 टक्के वाढ्‌ करण्याचे, सिगारेट पाकिटावरील 80 टक्के भागावर सावधगिरीच्या इशाऱ्याचे चित्र ठेवण्याची आणि शिक्षण संस्थांपासून 100 मीटर्सपर्यंत तंबाखूच्या विक्रीवर बंदी घालण्याचा सरकार विचार करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)