श्रीलंकेत नाट्यमय घडामोडींमुळे पेच

कोलंबो – श्रीलंकेत शुक्रवारी नाट्यमय राजकीय घडामोडी घडून माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांचे सत्तास्थानी कमबॅक झाले. त्या देशाचे अध्यक्ष मैथ्रिपाला सिरीसेना यांनी रानिल विक्रमसिंघे यांना पंतप्रधानपदावरून हटवले. त्यांच्या जागी राजपक्षे यांना पंतप्रधान बनवण्यात आले. मात्र, अचानक घडलेल्या त्या नाट्यानंतर श्रीलंकेत मोठा राजकीय आणि घटनात्मक पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

सिरीसेना आणि विक्रमसिंघे यांनी एकत्र येऊन 2015 मध्ये श्रीलंकेत सरकार स्थापन केले. त्यांच्या हातमिळवणीमुळे राजपक्षे यांची दशकभराची राजवट उलथली गेली. मात्र, काही दिवसांपासून सिरीसेना आणि विक्रमसिंघे यांचे संबंध ताणले गेले होते. सिरीसेना यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून त्यांच्या पक्षांमधील धुसफूस आणखीच वाढल्याचे चित्र होते. अशात अचानकपणे सिरीसेना यांनी त्यांचा युनायटेड पीपल्स फ्रिडम अलायन्स हा पक्ष सरकारमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ त्यांनी पंतप्रधानपदी राजपक्षे यांची वर्णी लावली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता नव्या सरकारकडे बहुमत नसल्याने त्याच्या स्थैर्याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पार्टीच्या संसदेत 106 जागा आहेत. तो पक्ष बहुमतापासून केवळ 7 जागा दूर आहे. तर सिरीसेना आणि राजपक्षे यांच्या पक्षांच्या मिळून केवळ 95 जागा आहेत. त्यामुळे आधी एकमेकांना विरोध केल्यानंतर आता एकत्र आलेले सिरीसेना आणि राजपक्षे त्यांच्या सरकारचे बहुमत कसे सिद्ध करणार हा कळीचा प्रश्‍न बनला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)