श्रीलंकेतील राजकीय संकटाबाबत चीनने झटकले हात 

पेईचिंग़ (चीन): श्रीलंकेतील राजकीय संकटाबाबत चीनने हात झटकले आहेत. श्रीलंकेतीत आताच्या राजकीय पेचप्रसंगाबाबत प्रश्‍न केला असता, तो श्रीलंकेचा अंतर्गत मामला आहे. कोणत्याही देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष न घालण्याचे चीनचे धोरण आहे; असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी म्हटले आहे. यांनी त्याबाबत काहीही टिप्पणी करणे टाळले आहे. मात्र चीन श्रीलंकेतील राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाला सिरिसेना यांनी पंतप्रधान रानील विक्रमसिंगे यांना बरखास्त करून माजी अध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केल्यानंतर श्रीलंकेतील पेचप्रसंग अधिक चिघळला आहे. श्रीलंकतील राजकीय पक्ष चर्चा आणि विचारविनिमयांनी परस्पर मतभेद मिटवून टाकतील अशी अपेक्षा चीनने व्यक्त केली आहे. श्रीलंका हा चीनचा सहयोगी देश असून चीनने श्रेलंकेत मोठी गुंतवणूक केलेली आहे. श्रीलंका आणि चीन शेजारी राष्ट्रे असून आम्ही श्रीलंकेतील राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत असे लु कांग यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)