श्रीलंकेतील महिंदा राजपक्षे सरकारच्या विरोधातील अविश्‍वास प्रस्ताव संसदेत मंजूर 

अध्यक्ष मैथिरीपाला सिरीसेना यांना जबर धक्का 

कोलंबो: श्रीलंकेतील विद्यमान महिंदा राजपक्षे सरकारच्या विरोधातील अविश्‍वास प्रस्ताव आज त्या देशाच्या संसदेत मंजुर करण्यात आला. त्यामुळे अध्यक्ष मैथिरीपाला सिरीसेना यांनी नियुक्त केलेल्या सरकारवर नामुष्कीची वेळ आली आहे.

-Ads-

अध्यक्षांनी पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांचे बहुमतातील सरकार बरखास्त करून तेथे महिंदा राजपक्षे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेस अनुमती दिल्यानंतर श्रीलंकेत मोठाच राजकीय पेच प्रसंग निर्माण झाला होता. आमच्या पाठीशी पुर्ण बहुमत असताना आमचे सरकार बरखास्त करण्याचा निर्णय बेकायदेशीर आहे असा दावा करीत रानील विक्रमसिंघे यांनी राजपक्षे यांच्या सरकारला आव्हान दिले होते. संसदेत बहुमत सिद्ध करण्याचे आवाहनही त्यांनी दिले होते. पण अध्यक्षांनी संसदेचे अधिवेशनच होऊ दिले नाही.

तथापि 26 ऑक्‍टोबर नंतर आज प्रथमच श्रीलंका संसदेचे अधिवेशन झाले. त्यात मांडण्यात आलेल्या अविश्‍वास ठरावाच्यावेळी सरकारची पुरती नाचक्की झाली त्यामुळे पुन्हा रानील विक्रमसिंघे यांचे सरकार त्या देशात प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 225 सदस्यांच्या संसदेत आवाजी मतदानाने अविश्‍वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. त्यात सरकारच्या विरोधातील अविश्‍वास प्रस्ताव मंजुर झाल्याची घोषणा संसदेचे सभापती कारू जयसुर्या यांनी केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)