श्रीलंकेच्या संघाला आणखी एक धक्‍का : दिनेश चंडील मालिकेतून बाहेर 

सलग पराभवामुळे चिंताग्रस्त असलेल्या श्रीलंकेच्या संघाला भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आणखी एक धक्‍का बसला आहे. कसोटी संघाचा कर्णधार आणि महत्त्वाच्या खेळाडूपैकी एक दिनेश चंडीमल संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डने दिलेल्या माहितीनुसार, अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे चंडीमल अन्य सामन्यात खेळू शकणार  नाही. तसेच तो केव्हा तंदुरूस्त होईल हेही आताच सांगणे अशक्‍य नाही. सध्या त्याला कोलंबोत डॉक्‍टरांकडे उपचारासाठी पाठविण्यात येणार असून त्यानंतर त्याच्या दुखापतीबाबत आणि वापसीबाबत माहिती मिळेल, असे सांगण्यात आले. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्याच्या बाऊंसर चेंडूवर चंडीमलला दुखापत झाली होती. चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात त्याच्या अंगठ्यावर जोरात चेंडू आदळल्याने तो मैदानावरच बसला होता.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)