श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी घेतले तिरूपतीचे दर्शन

तिरूपती – श्रीलंकेचे पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांनी येथील प्रख्यात बालाजी मंदिरात जाऊन सपत्नीक दर्शन घेतले. सकाळी ते मुद्दाम या दर्शनासाठी तिरूपतीत आले होते. यावेळी मंदिराच्या विश्‍वस्तांनी त्यांचे स्वागत केले.

श्रीलंकेतून चेन्नाईत आल्यानंतर ते हेलिकॉप्टरने तिरूपतीला आले. त्यांची या तीर्थ क्षेत्राची आत्तापर्यंतची तिसरी भेट आहे. या आधी 2002 आणि 2016 या वर्षी ते येथे आले होते. त्यांच्या या भेटीनिमीत्त मंदिराच्या परिसरात कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)