श्रीलंका संसद सत्र एका महिन्यासाठी निलंबित – राष्ट्रपतींचा अनपेक्षित निर्णय

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेतील वाढत्या राजकीय संकटाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती मैत्रीपाला सिरसिंगे यांनी संसद सत्र एका महिन्यासाठी निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र यासाठी कोणतेही कारण देण्यात आलेले नाही.
माजी राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांच्या नवीन पक्षाने स्थानिक निवडणुकांत दमदार यश मिळवल्यानंतर एसएलएफपी (श्री लंका फ्रीडम पार्टी) आणि यूएनपी (युनायटेड नॅशनल पार्टी) यांच्या यांचे युती सरकार अडचणीत आले होते.

राजपक्षे याच्या पक्षाच्या यशाकडे सत्ताधारी युतीवरील जनमत संग्रहाच्या दृष्टीने पाहिले जात आहे. अशा स्थितीत राष्ट्रपती मैत्रीपाला सिरसिंगे यांनी 12 एप्रिल 2018 रोजी रात्री संविधान कलम 70 द्वारे राष्ट्रपतींना मिळालेल्या विशेष अधिकारांच वापर करत संसदेचे चालू अशिवेशन समाप्त करण्याची आणि पुढील अधिवेशन 8 मे पासून सुरू करण्याची घोषणा केली. 19 एप्रिल रोजी संसदेची बैठक होणार होती. पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव दाखल करण्याची मागणी या मंत्र्यांनी केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)