श्रीलंका, बांगलादेशला विश्‍वचषकात थेट प्रवेश नाही 

आयसीसी टी-20 विश्‍वचषक स्पर्धा 2020

दुबई  – ऑस्ट्रेलियात 2020 मध्ये होणाऱ्या ट्‌वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरलेल्या संघांची घोषणा आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) केली. या मध्ये माजी विश्‍वचषक विजेत्या श्रीलंका आणि बांगलादेशच्या संघाला थेट प्रवेश मिळाला नसून त्यांना पात्रता फेरीच अडथळा दुर करुन स्पर्धेत खेळावे लागणार आहे.

31 डिसेंबर 2018च्या आयसीसी ट्‌वेंटी-20 क्रमवारीनुसार हे संघ ठरवण्यात आले आहेत. पात्रतेच्या निकषानुसार यजमान ऑस्ट्रेलिया आणि अन्य नऊ संघ विश्‍वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले आहेत. त्यातील अव्वल आठ संघ थेट सुपर 12 मध्ये खेळतील, तर उर्वरित दोन संघ अन्य सहा संघांसह साखळी फेरीत खेळतील. हे अन्य सहा संघ पात्रता फेरीतील असतील.
आयसीसीच्या ट्‌वेंटी-20 क्रमवारीनुसार पाकिस्तान, भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांनी सुपर 12 संघांत थेट प्रवेश मिळवला आहे. माजी विजेते आणि तीन वेळचे उपविजेते श्रीलंका व बांगलादेश यांना साखळी फेरीत खेळावे लागणार आहे. 18 ऑक्‍टोबर ते 15 नोव्हेंबर 2020 या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगाने संघाला सुपर 12 मध्ये प्रवेश न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे, यावेळी बोलताना तो म्हणाला की, विश्‍वचषकात थेटप्रवेश न मिळाल्याच्या बातमीने मी नाराज झालो आहे. सर्वांनाच अपेक्षा असते की आपण पहिल्या आठ संघांमध्ये असायला हवे. मात्र, आम्ही पात्रता फेरीत सामने खेळायला मिलाल्याच्या संधीचा फायदा उचलताना विश्‍वचषकाची पुर्ण तयारी करताना साखळी फेरीत दमदार कामगिरी करण्याचा निर्धार मालिंगाने व्यक्त केला. तर, बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन यानेही सुपर 12 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)