श्रीलंकन नौदलाकडून 8 भारतीय मच्छिमारांना अटक

रामेश्‍वरम -श्रीलकंन नौदलाने पुन्हा आगळीक करत आज आठ भारतीय मच्छिमारांना अटक केली. संबंधित मच्छिमार तामीळनाडूचे रहिवासी आहेत. श्रीलंकन नौदलाने दोन स्वतंत्र घटनांमध्ये भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेतले. त्यांच्या दोन नावाही जप्त करण्यात आल्या.

भारतीय मच्छिमारांनी आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडून आमच्या हद्दीत मासेमारी केल्याचा कांगावा श्रीलंकेच्या नौदलाने केला. नेदूनथीवूनजीक भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेण्यात आले. ते तामीळनाडूतील रामेश्‍वरम आणि मंडपमचे रहिवासी आहेत. दोन दिवसीय हिंद महासागर परिषेत सहभागी होण्यासाठी आजच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज श्रीलंकेची राजधानी कोलंबोत दाखल झाल्या.

नेमक्‍या याच दिवशी श्रीलंकन नौदलाकडून भारतीय मच्छिमारांना अटक होण्याची घटना घडली. भारतीय मच्छिमारांना श्रीलंकन नौदलाकडून अटक केल्या जाण्याच्या किंवा त्यांच्यावर हल्ले होण्याच्या घटना सातत्याने घडतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)