श्रीराम पतसंस्थेचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न फसला

संगमनेर – संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा येथील श्रीराम पतसंस्थेचे कार्यालय फोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला, मात्र अचानक सुरु झालेल्या सायरनच्या आवाजामुळे त्यांना रिकाम्या हाती परतावे लागल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली.

या बाबत पतसंस्थेचे रोखपाल राजाराम कुरकुटे यांनी घारगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. काल सायंकाळी पाचच्या सुमारास कामकाज संपवून सर्व कर्मचारी घरी गेले होते. गुरुवार ( ता. 29 ) च्या पहाटे चारच्या सुमारास  राजाराम कुरकुटे यांना  सखाराम जटार यांनी दुरध्वनीवरुन पतसंस्थेतील सायरन वाजत असल्याची माहिती  दिल्याने, व्यवस्थापक अध्यक्ष व भाऊ शिंदे यांनी पहाणी केली असता, रात्री अज्ञात चोरट्यांनी लोखंडी ग्रील कापून बाथरुम मध्ये प्रवेश केल्याचे व नंतर आतील दोन दरवाजे तोडून हॉलपर्यंत पोचल्याचे लक्षात आले.

मात्र या दरम्यान सायरन वाजू लागल्याने, त्यांनी पळ काढला. या पतसंस्थेत चोरीचा हा सहावा प्रयत्न आहे. बाबत घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यां विरुध्द गु. र. नं. 37 / 2018 प्रमाणे भा.द.वी. 457, 380, 511 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)