श्रीराम नवमीनिमित्त शिर्डीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

पदयात्रीचे जल्लोषात स्वागत
साईसमाधी शताब्दी वर्षानिमित्त श्रीरामनवमी उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर श्रीक्षेत्र काशी साईसेवक मंडळाचे कार्यकर्ते तसेच पंढरपूर आदी ठिकाणाहून गंगाजल आणणाऱ्या पदयात्री भाविकांचे आज शिर्डीत आगमन होत असून, त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. या स्वागत समारंभाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

शिर्डी – सालाबादप्रमाणे यावर्षीही साईबाबांच्या श्रीराम नवमी उत्सवानिमित्त दि. 23 ते 28 मार्चदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन साईबाबा संस्थान, नगरपंचायत, शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा साईभक्त व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रामनवमी उत्सव यात्रा कमिटीचे अध्यक्ष पतिंगराव शेळके, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, बाबासाहेब कोते, नगराध्यक्षा योगिताताई शेळके, उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर यांनी केले आहे.

रविवार, दि. 25 मार्च रोजी रात्री 8 ते 12.30 वाजता हरिभाऊ बडे नगरकर यांचा लोकनाट्य तमाशा स्व. भागचंद कोंडाजी गोंदकर मैदानावर होणार आहे. दि. 26 मार्च रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजेदरम्यान कुस्त्यांचा हगामा साईनगर मैदानावर होईल. दि. 27 मार्च रोजी रात्री 8 ते 12.30 वा. रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशा महालक्ष्मी मंदिरासमोरील स्व. भागचंद गोंदकर मैदानावर होईल. बुधवार, दि. 28 मार्च रोजी रात्री 8 ते 12.30 वा. सिनेस्टार संस्कृती बालगुडे, “शांताबाई’ फेम राधिका पाटील यांचा लावणी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम नवमी उत्सवानिमित्त शहरातील प्रमुख रस्त्यांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उत्सवानिमित्त मुंबई, गुजरात, पुणे, मध्यप्रदेश, आदी ठिकाणाहून येणाऱ्या साईपालखी पदयात्रीचे शहरात आगमन होण्यापूर्वी स्वागत करण्यात येणार आहे. सर्व कार्यक्रम शांततेत संपन्न व्हावे यासाठी उत्सव कमिटीचे सर्व सदस्य तसेच शिर्डी ग्रामस्थ प्रयत्नशील राहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)