श्रीराम दूध संस्थेच्या वतीने बोनस वाटप

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील पिंपळगाव-खडकी येथील श्रीराम सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिपावलीनिमित्त बोनसचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांना 33 लाख 88 हजार 651 रुपयांच्या बोनसचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष आत्माराम कुरकुटे यांनी दिली. श्रीराम दूध संस्थेचे 511 सभासद असून 250 दूध उत्पादक शेतकरी आहेत. संस्थेचे भागभांडवल 6 लाख 88 हजार 610 रुपये आहे. रोजचे दूध संकलन 7 हजार लीटर आहे. बोनस वाटप प्रसंगी संस्थेचे संचालक रामनाथ बांगर, दादाभाऊ पोखरकर, विलास पोखरकर, रोहिदास पोखरकर, रामदास बांगर, गेनभाऊ वाघमारे आदि उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)