श्रीराम ट्रान्स्पोर्टचा एनसीडी येणार 

मुंबई-श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स कंपनीकडून 5 कोटी एनसीडी बाजारात आणण्यात येणार असून त्या माध्यमातून 5 हजार कोटी रुपये उभारण्यात येतील. या एनसीडीचे दर्शनी मूल्य 1 हजार रुपये असून ते सुरक्षित आणि ठराविक मुदतीत परतावा देतील. हे अपरिवर्तनीय रोखे 27 जूनपासून खरेदीसाठी खुले, तर 20 जुलै रोजी बंद होतील. बेस इश्‍यूच्या विक्रीतून मुदतीपूर्वी निधी उभारणी झाल्यास ते लवकर बंद अथवा कालमर्यादा वाढविण्यात येईल. या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या निधीचा वापर कंपनी पुढील कर्ज, वित्तपुरवठा, परतफेड, चालू वर्षाचे व्याज, मूळ रकमेचा आगाऊ भरणा, अन्य कंपनीच्या कार्यासाठी करण्यात येईल. गुंतवणुकीसाठी 3, 5, 10 वर्षांच्या कालावधीचे पर्याय उपलब्ध असून अनुक्रमे प्रतिवर्षी 9.10 टक्‍के, 9.30 टक्‍के, 9.40 टक्‍के व्याज मिळेल. या गुंतवणुकीवर निवडीनुसार प्रतिमहा, प्रतिवर्षी एकत्रित परताव्याचा पर्याय आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)