श्रीराम जन्मोत्सव भक्तीपूर्ण वातावरणात साजरा

कीर्तनकार चैत्राली जोशी : भर उन्हाळ्यात जन्म घेऊन प्रभू रामचंद्रांनी भाविकांच्या जीवनातील उन्हाळाच दूर केलाय
नगर- श्रीराम नवमीनिमित्त गुजर गल्ली, स्वामी विवेकानंद चौकातील रामदासी वाड्यात प्रभूरामचंद्रांच्या जयजयकारात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. दि. 18 मार्च गुढीपडावा पासून सुरु झालेल्या नवरात्र उत्सवाची सांगता झाली. यानिमित्त पुण्याच्या प्रसिद्ध नारदीय कीर्तनकार चैत्राली जोशी यांचे राम जन्मावर कीर्तन झाले.
सुनील रामदासी यांच्या वाड्यात श्रीराम जन्म साजरा करण्याची सुमारे 100 वर्षाहून अधिक जुनी ऐतिहासिक परंपरा आहे. त्यांच्या देवघरात सज्जन गडचे समर्थ रामदास स्वामी यांच्या पूजेतील रामाच्या मूर्ती सारखीच रामाची पुरातन मूर्ती आहे. दरवर्षी रामनवमीनिमित्त मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी नारदीय कीर्तनकार चैत्राली जोशी यांनी कीर्तनातून प्रभुरामचंद्राचे जीवन कार्य सांगून प्रत्येकाने रामाचे कार्य आत्मसात करून आचरणात आणल्यास भारतात पुन्हा रामराज्य येण्यास वेळ लागणर नाही. चैत्र शुद्ध नवमीला भर उन्हाळ्यात जन्म घेऊन प्रभूरामचंद्रांनी भाविकांच्या जीवनातील उन्हाळाच दूर केला आहे, असे सांगून रामाच्या आदर्श कार्याचे उदाहरणे दिली.
यावेळी कीर्तनानंतर महाआरती करण्यात आली. तसेच उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी खा. दिलीप गांधी, माजी महापौर भगवान फुलसैंदर, भाजपा मध्यमंडळ अध्याक्ष नरेंद्र कुलकर्णी, किशोर बोरा, सुवेंद्र गांधी, हिंद सेवा मंडळ अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, ब्रिजलाल सारडा, ऍड. अनंत फडणीस, अजित बोरा, डॉ. पारस कोठारी आदींसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)