श्रीराम जन्मभूमीप्रकरणी खासदार चंद्रकांत खैरे यांना समन्स

औरंगाबाद: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे राज्यासह अयोध्येतले वातावरण तापलेले आहे. याचवेळी दुसऱ्या बाजूला शिवसेना नेते आणि खासदार चंद्रकांत खैरे यांना 1993 च्या श्रीराम जन्मभूमी प्रकरणात सीबीआय न्यायालयाने समन्स बजावले आहे. श्रीराम जन्मभूमी प्रकरणात पवनकुमार पांडे यांच्यासह अन्य कारसेवकांवर आरोप निश्‍चित करण्यात आले होते. त्यावेळी साक्षीदार म्हणून खैरे यांना सीबीआयने घटनास्थळावरून ताब्यात घेतले होते. त्यावेळी खैरे आमदार होते.

1993 सालापासून सुरु असलेल्या या प्रकरणात येत्या 28 नोव्हेंबर रोजी राम जन्मभूमीसंबधीच्या खटल्यावर लखनौ न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीवेळी हजर राहण्यासाठी खैरे यांना समन्स बजावण्यात आले आहे. श्रीराम जन्मभूमी प्रकरणात शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

-Ads-

लखनौ न्यायालयाने खैरे यांना बजावलेल्या नोटिसीसंदर्भात 28 नोव्हेंबर रोजी विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणात कलम 120 ब, 147, 149, 395, 397, 332, व भारतीय दंड संहितेचे कलम 197/ 92, 98/92नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत चंद्रकांत खैरे म्हणाले की, 28 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीला मी उपस्थित राहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)