श्रीराम गाळपाचे उद्दिष्ट निश्‍चित पूर्ण करणार : ना. रामराजे

फलटण ः गळीत हंगामाचा शुभारंभप्रसंगी ना. रामराजे नाईक-निंबाळकर, दादाराजे खर्डेकर, बाळासाहेब शेंडे आदी मान्यवर.

फलटण, दि. 31 (प्रतिनिधि) : श्रीराम जवाहर शेतकरी साखर कारखाना आगामी हंगामात पाच लाख मे. टन उस गाळपाचे उद्दिष्ट निश्‍चित पूर्ण करणार आहे. इतर कारखान्याच्या बरोबरिने चांगला दर देण्याचा प्रयत्न करणार आहे. अडचणीतून बाहेर निघणाऱ्या श्रीरामला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन विधान प रिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग याच्या तेराव्या गाळप हंगामाची त्यांच्या हस्ते सुरुवात क ारखाना स्थळी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग याच्या तेराव्या गाळप हंगामाची त्यांच्या हस्ते सुरुवात
कारखाना स्थळी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
इथेनॉल प्रकल्प हा एकमेव नफ्यात चालणारा उद्योग आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान वापरून त्याची आपल्याला सुरुवात केली पाहिजे. यंदा पाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. उसाची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे. बरड परिसरात कुरवली येथे खासगी जागेवर परंतू सहकारी तत्वावर साखर कारखाना उभाणार आहे. त्या संदर्भातील अडचणी दूर झाल्या आहेत. तालुक्‍यातील चार साखर कारखान्यांमुळे शेतकऱ्यांना उसासाठी दुसरीकडे जावे लागणार नाही. कारखाना चांगला चालला तरच तुम्ही जगाल असे ही ते म्हणाले.
आमच्या आजोबांनी म्हणजेच मालोजीराजांनी हा कारखाना 1957 साली सुरू केला .मात्र 2002 चाली आर्थिक अडचणीत आलेला हा कारखाना कोणताही राजकीय विचार न करता भाडेपट्ट्यावर चालविण्यास दिला. अशा वेळी जवाहर साखर कारखान्याचे प्रकाश आवाडे यांच्या सहकार्याने हा भागीदारीत कारखाना चालवून कर्जमुक्त करण्याच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेला आहे. गतवर्षी एफआरपी + 400 रुपये प्रति टन जास्त दर या कारखान्याने दिलेला आहे.गतवर्षी कारखान्याची एफ आर पी 2259 रुपये इतकी आहे. त्यापेक्षा 381 रुपये जास्त देण्यात आलेले आहेत. यावेळीही चांगला दर मिळेल असे रामराजेनी स्पष्ट केले.तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी या कारखान्याला ऊस घालण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी हक्काने केले.
प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडे यांनी केले. त्यांनी शेतकऱ्यांना कारखान्याला ऊस घालावा असे आवाहन केले. यंदा 8026 हेक्‍टर क्षेत्रावरील ऊस उपलब्ध आहे. असे ही ते म्हणाले.
यावेळी आ. दीपक चव्हाण, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी अध्यक्ष दादाराजे खर्डेकर, तसेच जवाहर कारखान्याचे अप्पासाहेब गोटखिंडे, कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडे, उपाध्यक्ष नितीन भोसले, पंचायत समितीच्या सभापती सौ. प्रतिभा धुमाळ, माजी सभापती रेश्‍मा भोसले, उपसभापती शिवरूपराजे खर्डेकर, राष्टवादि कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे , कारखान्याचे संचालक, सभासद आदी यावेळी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)