श्रीरामपूर येथे बियाणे प्रक्रिया तंत्रज्ञानावर आधारीत प्रशिक्षण

नगर – महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व महाबीज अकोला यांच्या संयुक्‍त विद्यमाने शेतकरी, शेतकरी गट व युवक-युवतीकरिता श्रीरामपूर येथे 8 दिवसीय बियाणे प्रक्रिया तंत्रज्ञानावर आधारित व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात बियाणे प्रक्रिया मशिनरीची कार्यप्रणाली व देखभाल, बियाणांचे भांडारण, बियाणे पात्रतेचे निकष, बियाणे खात्री कशी करावी, प्रमाणित बियाणे म्हणजे काय, मशिनरीवर प्रात्यक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण तसेच प्रशिक्षण कालावधीत विविध शासकीय योजनांची माहिती व उद्योजकीय विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाकरिता शेतकरी, शेतकरी गट व युवक-युवती यांचा वयोगट 18 ते 60 वर्षे, अर्जदार हा जिल्ह्यातील रहिवासी असावा, प्रशिक्षणाला नियमितपणे हजर राहण्याची तयारी, शेतकरी, शेतकरी गट व बियाणे प्रक्रियामध्ये आवड असणारा असावा अशी पात्रता असलेले उमेदवार अर्ज करु शकतील. असे प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)