उपाध्यक्षपदी सचिन टाकसाळ यांची निवड
श्रीरामपूर – श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कांदा व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत कांदा व्यापारी असोसिएशन अध्यक्षपदी नानासाहेब गवारे यांची, तर उपाध्यक्षपदी सचिन टाकसाळ यांची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी संजू गादिया होते. कार्यकारिणीत अमोल शेटे सेक्रेटरीपदी व किशोर कालंगडे खजिनदारपदी निवड झाली. संजय गादिया यांनी माजी अध्यक्ष रमेश सोनावणे यांनी 25 वर्षे मार्केट कमिटीत योगदान दिल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. संस्थेचे संचालक जितेंद्र गदिया, मावळते अध्यक्ष रमेश सोनावणे, दिनेश पवार, शरद कोठारी, विजय छाजेड, गणेश शेटे, ओंकार शेटे, विकास लडकर, बाबासाहेब ढोकचौळे आदी व्यापारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)