श्रीरामपूरच्या ढोल-ताशा पथकाच्या गाडीला अपघात

एक ठार, 12 जखमी
श्रीरामपूर – शहरातील ढोल-ताशा पथकाला घेऊन जाणाऱ्या मोटारीला दुधाच्या टॅंकरने धडक दिली. त्यात पथकातील एक जण ठार तर 12 जण जखमी झाले. नगर-कल्याण महामार्गावर आळेफाटा परिसरात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे शहरावर शोककळा पसरली आहे.
ढोल- ताशा पथकातील संजय रखमाजी त्रिभुवन (वय 50) यांचा अपघातात मृत्यू झाला. तर शाहरूख रशिद शेख (वय 23), ख्वाजा रशिद शेख (वय 25), विशाल दिलीप थोरात (वय 22), सागर कचरू शेलार (वय 24), राजू संजय साबळे (वय 19), संजू पुजा भालेराव (वय 31), किरण हनुमंत ननावरे (वय 28), उमेश चव्हाण (वय 30), अजय धिवर (वय 26), सचिन बोरकर (वय 20), नरेंद्र चव्हाण (वय 27), विष्णू शेलार (वय 30) (सर्व रा. श्रीरामपुर, जि. अहमदनगर) हे जखमी झाले. यातील गंभीर जखमी शेख बंधु व किरण ननावरे यांना पुढील उपचारासाठी संगमनेर व नगर येथे हलविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील पुनम ढोल पार्टीचे पथक मुंबई येथील गणेश उत्सव कार्यक्रमात ढोल वाजविण्यासाठी गेले होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी मिरवणूकीत ढोल वाजविण्याचे काम केल्यानंतर पथक एमएच 14, डीएम. 2829 या क्रमांकाच्या मालवाहू मोटारीतून कल्याण महामार्गाने शहराकडे परतत होते. त्यावेळी आळेफाट्‌यापासून जवळच असलेल्या वडगाव आनंद परिसरात समोरून येणाऱ्या दुधाच्या एमएच 14 बीजे 6896 या क्रमांकाच्या टॅंकरने समोरुन धडक दिली. अपघातानंतर गावकरी व आळेफाटा पोलिसांनी जखमींना मदत केली. उपचारासाठी आळेफाटा येथील दवाखान्यात दाखल केले. तसेच गंभीर जखमींना नगर व संगमनेरला हलविण्यासाठी मदत केली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)