श्रीरामपुरात स्वच्छता विषयक स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

श्रीरामपूर – स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नगरपरिषदेने घेतलेल्या स्वच्छता विषयक विविध स्पर्धेचा निकाल जाहीर करून बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी स्वच्छतेचा ब्रॅण्ड ऍम्बेसिडर व्यंकटेश पांडे, मुख्याधिकारी सुमंत मोरे, नगरसेवक रवी पाटील, केतन खोरे, कलीम कुरेशी, संतलुक रुग्णालयाच्या सिस्टर मेरी, जिजाऊ मंडळाच्या अध्यक्षा जया जगताप, आरोग्य विभागाचे रमेश अपिल तसेच आधिकरी व कर्मचारी उपस्थित होते.

स्वच्छ हॉटेल स्पर्धेत लक्ष्मीनारायण पॅलेस प्रथम, हॉटेल सिल्व्हर स्पून द्वितीय व हॉटेल वरद तृतीय तसेच स्वच्छ शाळेसाठी नगरपालिका शाळा क्रमांक सात प्रथम, न्यू इंग्लीश स्कूल द्वितीय व डी. डी. काचोळे विद्यालय तृतीय आणि स्वच्छ रुग्णालयांसाठी संतलुक रुग्णालय प्रथम, देव रुग्णालय द्वितीय व कडू रुग्णालयाला तृतीय क्रमांक मिळाला. कचरा संकलन वाहनावरील बाळू गायकवाड व ज्ञानेश्वर साळुंके यांना नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)