श्रीरामपुरात नऊ हजार 968 बालकांना पोलिओ डोस

श्रीरामपूर – राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानात पाच वर्षाखालील नऊ हजार 968 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. नगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पऱ्हे व रोटरी क्‍लबचे अध्यक्ष डॉ. सुरज थोरात यांनी दिली.

पल्स पोलिओ मोहिम राबविताना प्रशासनाने शहरात 33 केंद्रे उभारण्यात आली होती. यात दोन फिरत्या टीमने प्रामुख्याने शाळा, अंगणवाडी तसेच दवाखान्यात ही मोहिम राबविली.नगराध्यक्षा अनुराधा आदिक, आमदार भाऊसाहेब कांबळे, कामगार नेते अविनाश आपटे यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी सुंमत मोरे, डॉ. सुरज थोरत, विनोद पाटणी, अविनाश सलालकर, डॉ. सचिन पर्ऱ्हे, तालुका आरोग्य आधिकारी डॉ. मोहन शिंदे, डॉ. योगश बंड, डॉ. भारत गिडवाणी, उल्हास धुमाळ, गणेश देशपांडे, राजेश कुंदे, ज्ञानेश्‍वर मुरकुटे, किशोर बत्तीसे, आशासेविका सौनल जैत, रोहीणी उंडे, रुक्‍सार शेख, राजेद्र सांगळे, निशिकांत बुगदे उपस्थित होते.
यावेळी रोटरी क्‍लबच्यावतीने बालकांना चेंडू व ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने नाश्‍ता देण्यात आला. शहरातील 33 केंद्रातून 11 हजार 187 बालकांपैकी नऊ हजार 968 बालकाना डोस देण्यात आला. उर्वरीत एक हजार 919 बालकांना येत्या पाच दिवसात घरोघर जाऊन डोस दिला जाणार असल्याचे डॉ. मोहन शिंदे, डॉ. योगश बंड, डॉ. सचिन पऱ्हे यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)