श्रीरामपुरात आजपासून श्रीरामनवमी यात्रा

श्रीरामपूर – शहरातील सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामनवमी यात्रेस रविवारपासून सुरुवात होत आहे. यात्रेचे यंदाचे 88 वे वर्ष आहे. यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. श्रीराम, जैन, हनुमान व काळाराम मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
यात्रेनिमित्त साईकथाकार बाळकृष्ण महाराज सुरासे यांच्या नेतृत्वाखाली आठ दिवसांपासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू आहे. उद्या रामनवमीच्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने त्याची सांगता होईल. त्यानंतर दुपारी 12 वाजता मंदिरात पाळणा हलवून श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यावेळी भाविकांना पंजिरी प्रसादाचे वाटप करण्यात येईल. रामजन्म सोहळ्यानंतर मंदिरावर दिवसभर झेंड्यांची वाजत गाजत मिरवणूक काढून ते मंदिरावर चढवले जातात.

महसूल, पोलीस प्रशासनासह विविध पक्ष, सामाजिक संघटना मंदिरावर झेंडे चढवितात. यात्रा समितीच्या वतीने सायंकाळी 7 वाजता सजविलेल्या रथातून श्रीराम, लक्ष्मण व सीता व हनुमान यांच्या मूर्तीची मिरवणूक काढली जाणार आहे. 8 वाजता कालव्याजवळ शोभेच्या दारुची आतषबाजी केली जाणार आहे.
दि. 26 रोजी सकाळी मंदिरात 80 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार असून, सायंकाळी 7 वाजता रथातून शनिदेवाचा छबिना काढण्यात येणार आहे. तिसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. 27) सकाळ-दुपारच्या सत्रात कुस्त्यांचा हगामा भरविला जाणार आहे. सायंकाळी बोरावके व उपाध्ये परिवाराच्या वतीने मानाच्या कुस्तीतील पहिलवानांना सुवर्णपदक देऊन गौरविले जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)