श्रीरामपुरातील मेळाव्यात 206 तक्रारींचा जागेवरच निपटारा

नगर – महावितरणकडून श्रीरामपूर विभागातील ग्राहकांसाठी सोमवारी (28 ऑगस्ट) आयोजित ग्राहक मेळाव्यात वीज ग्राहकांच्या 362 तक्रारी प्राप्त झाल्या. यातील 206 तक्रारींचे जागेवरच तातडीने निराकरण करण्यात आले.

श्रीरामपूर विभागातील श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, बाभळेश्वर तसेच राहुरी उपविभाग कार्यालयांमध्ये सोमवारी वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात वीज बिलाबाबत सर्वाधिक 289 तक्रारी प्राप्त झाल्या. यातील 161 तक्रारी मेळावास्थळीच सोडविण्यात आल्या. वीजपुरवठा व दुरुस्तीबाबत प्राप्त 41 पैकी 32 तक्रारींचे निरसन जागेवर करण्यात आले. नवीन वीज जोडणीबाबतच्या 19 पैकी 5 जणांना तातडीने जोडणी देण्यात आली. तर, इतर 13 पैकी 8 तक्रारी सोडविण्यात आल्या. उर्वरित 156 तक्रारी तातडीने सोडविण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आ. भाऊसाहेब कांबळे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव गाडे यांनी मेळाव्याला भेट देऊन महावितरणच्या उपक्रमाचे कौतुक केले. मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता शरद बंड यांच्यासह महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या मेळाव्यासाठी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)