श्रीमंत शाहु छत्रपती महाराजांनी सरकारचा चर्चेसाठी प्रस्ताव फेटाळला

कोल्हापूर – मराठा समाजाच्या मागणीबाबत सर्वकाही माहित असताना चार वर्षे सत्तेत येऊन सरकारने काहीच केलेले नाही. मुक मोर्चानंतर एक वर्ष होऊनही आतापर्यंत वेळ मारुन नेण्याचे काम केले आहे. आता आंदोलन चिघळले असताना आपल्याशी बंद खोलीत चर्चा कशासाठी असा सवाल करत श्रीमंत शाहु छत्रपती महाराज यांनी सरकारकडुन चर्चेसाठी येण्याचा आलेला प्रस्ताव फेटाळला.

तत्पूर्वी येथील सकल मराठा समाजातील आंदोलकांकडुन मराठा आरक्षण आंदोलन मोडीत काढण्याचा सरकारचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करत चर्चाच करायची असेल तर मराठा आरक्षणाचा अध्यादेशच आणा. त्यावेळीच चर्चा करु असा आक्रमक पवित्रा घेतला. तसेच छत्रपतींचा आर्शिवाद आणि त्यांच्याशी चर्चाच करायची असेल तर सरकारलाच इकडे छत्रपतींकडे चर्चेला यावे लागेल, असा इशाराही देण्यात आला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने आता ठोक मोर्चा आंदोलन सुरु करण्यात आले आहे. राज्यात सर्वत्र त्याचे हिंसक पडसाद उमटत आहेत. गेल्या आठ दिवसांपासुन कोल्हापूरात सकल मराठा समाजाच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौक येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु आहे. आंदोलनाचा भडकलेला वणवा कमी करण्यासाठी उद्या मुंबई येथे कोल्हापूरचे श्रीमंत शाहु छत्रपती महाराज यांच्यासह ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासह काही जणांना सरकारने चर्चेस बोलविले होते. यामुळे या चर्चेस जायचे की नाही याची चर्चा करण्यासाठी आज दुपारी श्रीमंत शाहु छत्रपती महाराज यांनी थेट आंदोलकांशीच मुस्लिम बोर्डींग येथे चर्चा केली.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)