श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ
पुणे: भाऊ लक्ष्मण जावळे उर्फ भाऊसाहेब रंगारी यांनी 1892 मध्ये या गणेशाची स्थापना केली. लाकूड आणि भुसा वापरून बनवलेली ही मूर्ती अतिशय वेगळेपण जपणारी आहे. याच्या स्थापनेपासून ही मूर्ती बदलण्यात आली नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतीकारी चळवळीमध्ये भाऊसाहेबांचा सहभाग होता. इंग्रजांचा जुलूम मोडून काढून स्वातंत्र्य मिळवून देण्याचे जे ध्येय होते त्याचे प्रतिबिंब या मूर्तीच्या घडणावळीत दिसते. राक्षसावर प्रहार करून त्याला यमसदनी पाठवणाऱ्या गणेशाची ही मूर्ती अतिशय देखणी आहे.
बुधवार पेठेतील सध्याच्या भाऊरंगारी मार्गावर असलेल्या विंचूरकर वाड्यात अजूनही भाऊसाहेबांच्या क्रांतीकारी सहभागाची साक्ष देणाऱ्या वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. काही वर्षांपूर्वी तेथील तळघरात या वस्तू सापडल्या असून, तेथे छोटे संग्रहालय ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.
या उत्सवाचा कार्यभार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट तर्फे चालवला जातो. बुधवार पेठेतील भाऊ रंगारी मार्ग येथील त्यांच्याच विंचूरकर वाड्याच्या बाहेर या मूर्तीची 11 दिवस प्रतिष्ठापना करण्यात येते. मूर्तीच्या स्थापनेपासून उत्सवाचे हे 127 वे वर्ष आहे. लाकडी मंडपात ही मूर्ती बसवण्यात येते. याच्यासमोर कोणतीही अन्य आरास केली जात नाही. पारंपरिक पद्धतीने मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा केला जातो.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)