श्रीमंत देशांच्या यादीत भारत जगात सहाव्या क्रमांकांवर

नवी दिल्ली-भारत जगातील सर्वांत श्रीमंत देशाच्या यादीत सहाव्या क्रमांकांवर आला आहे. या वर्षी भारतातील समृद्धी 25 टक्के इतक्‍या वेगाने वाढली असून तिचा वेग सर्वात जास्त आहे. त्याचबरोबर 2007 पासून भारताने वेगात प्रगती केल्यामुळे भारताची समृद्धी 170 टक्‍क्‍यांनी वाढली आहे.

न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार सध्या भारतात 8230 अब्ज डॉलरची समृद्धी आहे. पहिल्या क्रमांकावरील अमेरिकेकडे 64584 अब्ज डॉलरची तर दुसऱ्या क्रमांकावरील चीनकडे 24803 अब्ज डॉलरची समृद्धी आहे. तिसऱ्या क्रमांकावरील जपानकडे 19522 अब्ज डॉलरची तर चौथ्या क्रमांकावरील ब्रिटनकडे 9919 अब्ज डॉलरची व पाचव्या क्रमांकावरील जर्मनीकडे 9680 अब्ज डॉलरची समृद्धी आहे.

-Ads-

यात लोकाकडे असणाऱ्या खासगी मालमत्तेचे मूल्य विचारात घेतले आहे. लोकाकडे असलेली मालमत्ता, रोख रक्‍कम, शेअर आणि इतर बाबीचा यात समावेश आहे. मात्र यात सरकारकडे असलेल्या मालमत्तेचा समावेश केलेला नाही.
2017 मध्ये भारतातील खासगी संपत्तीत सर्वात जास्त म्हणजे 25 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. 2016 मध्ये भारतातील खासगी लोकांची संपत्ती 6548 अब्ज डॉलर होंती ती एका वर्षात 25 टक्‍क्‍यांनी वाढून 8230 अब्ज डॉलर झाली आहे.

या वर्षात चीनमधील समृद्धी 22 टक्‍क्‍यांनी तर जागतिक समृद्धी 12 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. सध्या जगातील खासगी लोकाकडे असलेली समृद्धी 215 लाख कोटी डॉलर असून ती गेल्या वर्षी 192 लाख खोटी डॉलर होती. भारतात 1 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त संपत्ती असलेले 3 लाख 30 हजार 400 लोक आहेत. अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून तेथे असे 50474000 लोक आहेत. भारतात 1 अब्ज डॉलरपेक्षा जास्त संपत्ती असलेले 119 लोक आहेत. यात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर येतो. अमेरिका आणि चीन भारताच्या पुढे आहेत. त्यामुळे भारताला सर्वसमावेशक विकासाकडे जास्त लक्ष द्यावे लागणार असल्याचे दिसून येते. सरलेल्या वर्षात शेअर बाजार निर्देशांक चांगले वाढले असल्यामुळे पहिल्या 10 देशातील लोकांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)