श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

यंदाचे मंडळाचे वर्ष १२६ वे 


मिरवणुकीस प्रारंभ सकाळी ८.३० वाजता


 श्रींची प्राणप्रतिष्ठापना  सकाळी  ११.५ वाजता 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे भक्तांचे लाडके आराध्य दैवत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने यंदा तामिळनाडू येथील श्री राजराजेश्‍वर मंदिर साकारण्यात आले आहे. यंदाचे हे 126 वर्ष आहे. गणेश चतुर्थीला (दि.13) सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी महान गाणपत्य श्री गणेश योगींद्राचार्यांच्या परंपरेतील डॉ. धुंडीराज पाठक शास्री यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

तामिळनाडू येथील तंजावर मधील श्री राजराजेश्‍वर मंदिर हे स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. चोल राजवटीतील राजे राजराज चोल यांनी या मंदिराची निर्मिती केली. हे मंदिर 13 मजली आहे. हे मंदिर सजावटीच्या माध्यमातून भाविकांसमोर आणण्याचा ट्रस्टचा प्रयत्न आहे. यंदा श्री राजराजेश्‍वर मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये मुख्य सभामंडप आणि गाभारा वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. गाभाऱ्यात गणेशपुराणात संदर्भ असलेल्या कळंब, सिध्दटेक, थेऊर आणि रांजणगावच्या गणेशासंबंधी विविध प्रसंग साकारण्यात येत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)