श्रीमंत गायकवाड वाड्याची न्यायाधीशांकडून पाहणी

राजगुरूनगर- दावडी (ता. खेड) येथील श्रीमंत दमाजीराव गायकवाड यांच्या पुरातन वाड्यास राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्‍त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी भेट देवून पाहणी केली. एवढेच नव्हे तर येथील पुरातन भुयारात 100 फूट प्रवेश करून या भुयाराची माहिती घेतली. दावडी येथे शनिवारी (दि. 23) कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरानंतर दावडीतील श्रीमंत दमाजीरव गायकवाड यांच्या वाड्याला राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्‍त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सलगर, न्यायाधीश एस. एन. पाटील, दिवाणी न्यायाधीश के. एच. पाटील, सह दिवाणी न्यायाधीश एस. सी. तायडे, कनिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधीसेवा समितीचे अध्यक्ष वाय. जे. तांबोळी, कनिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश एच. डी. देशिंग आदीसह ग्रामस्थांबरोबर भेट देत या ऐतिहासिक वास्तूची पाहणी केली. गायकवाड वाड्यातील गादी, माध्यमिक शाळा यांना भेट देवून स्थानिकांकडून या वाड्याची माहिती जाणून घेतली दरम्यान, या मान्यवरांनी निमगाव खंडोबा मंदिराला भेट देवून श्री खंडोबाचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)