श्रीमंत अंबरनाथ यात्रेनिमित्त धार्मिक कार्यक्रम

लोणी काळभोर- येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाच्या वार्षिक उत्सवानिमित्त गुढीपाडव्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली असून, आगामी पंधरा दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. लोणी काळभोर (ता. हवेली ) येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा चैत्र पौर्णिमेला (हनुमान जयंती) असते. यंदा ही यात्रा शनिवारी (दि. 31 मार्च) आणि रविवारी (दि. 1 एप्रिल) आहे. श्रीमंत अंबरनाथाच्या वार्षिक उत्सवानिमित्त चैत्र नवरात्रातील घटस्थापना शुक्रवारी (दि. 23) सायंकाळी सहा वाजता होणार आहे. मंगळवारी (दि. 27) सायंकाळी घाणा भरणे व हळद फोडण्याचा कार्यक्रम होणार असून, गुरवारी (दि. 29) सायंकाळी अंबरनाथ व जोगेश्वरीला हळद लावण्याचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (दि. 31) हनुमान जयंतीच्या दिवशी अंबरनाथाची महापूजा पहाटे चार वाजता होणार आहे. पालखी सोहळा झाल्यानंतर छबिन्याचा कार्यक्रम रात्री दहा वाजता सुरू होईल. रविवारी (दि. 1 एप्रिल) पहाटे चार वाजता अंबरनाथ व जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा होणार आहे. दुपारी कुस्त्यांचा जंगी आखाडा आयोजित करण्यात आला आहे. या आखाडयात महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या कुस्त्या होतात. विजेत्यांना जवळपास पंधरा लाखांचे रोख बक्षीस दिले जातात. सोमवारी (दि. 2) रात्री दहा वाजता वरात काढण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)