श्रीब्रह्मचैतन्य महाराजांचा जन्मोत्सव उत्साहात

गोंदवले खुर्द : ब्रम्हचैतन्य महाराजांच्या प्रतिमेची पालखीतुन मिरवणूक काढण्यात आली. (छाया : संदीप जठार)

गोंदवले, दि. 19 (वार्ताहर) – श्रीराम जयराम जयजयरामच्या जयघोषात गोंदवले खुर्द येथील मारुती मंदिरात श्रीब्रह्मचैतन्य महाराजांचा जन्मोत्सव सर्वांनी पुष्पवृष्टी करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. सायंकाळी प्रसाद वाटप करून पालखी मिरवणूक काढण्यात आली.
श्रीब्रह्मचैतन्य महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त गोंदवले खुर्द येथील मारुती मंदिरात गेले सात दिवस कीर्तन आणि काकड आरतीचा कार्यक्रम सुरु होता प्रज्ञाराम जप मंडळाच्या वतीने दररोज जप केला जात होता दि 17 रोजी सकाळी पहाटे काकड आरती नंतर सजवलेल्या पाळण्याची पूजा करून महाराजांचा जन्मोत्सव साजरा करत सुहासिनींनी पाळणा म्हटला व सगळ्यांना सुंठवडा वाटप करण्यात आलं. सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करन्यात आलं व सजवलेल्या पालखीतून महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)