श्रीपाद छिंदम याने नेले निवडणुकीसाठी दोन अर्ज

299 अर्जांची विक्री : महिलेकडून पहिला अर्ज दाखल

नगर – छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा आणि भारतीय जनता पक्षाचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याने आज निवडणुकीचा अर्ज नेला आहे. त्याचबरोबर पहिल्या दिवशी 299 अर्जांची विक्री झाली आहे. एका महिलेने अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.

-Ads-

महापालिकेची निवडणूक प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी 17 प्रभागांसाठी 299 अर्जांची विक्री झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यानेही दोन अर्ज नेले आहेत. प्रभाग नऊ व 13 मधून हे अर्ज नेले आहेत. छिंदम याने प्रभाग 13 मधून पत्नीच्या उमेदवारीसाठी, तर प्रभाग नऊमधून स्वतः साठी अर्ज नेला आहे. शीतल भुजबळ यांनी प्रभाग 13 मधून पहिला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मनोज भुजबळ, रवींद्र चंगेडिया, प्रशांत जावणे, सत्यम नामदे, अनिरुद्ध तिडके आदी उपस्थित होते. प्रभाग एक, सहा व सातसाठी 40 अर्ज, प्रभाग दोन, चार व पाचसाठी 22 अर्ज, प्रभाग तीन, नऊ व दहासाठी 73 अर्ज, प्रभाग आठ, 11 व 12 साठी 76, प्रभाग 13 व 14 साठी 26 अर्ज, प्रभाग 15, 16 व 17 साठी 62 अर्जांची विक्री झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)