श्रीनागोबा देवाच्या यात्रेला आजपासून प्रारंभ

धनगर समाज बांधवांचे आराध्य दैवत

म्हसवड – श्री नागोबा ता. माण येथील धनगर समाजाचे आराध्य दैवत लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या नागोबा देवाची यात्रा नामाच्या हरीच चांगभलं….कोळ होळच्या राजाचं चांगलभलच्या शनिवार, दि.22 पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होणार आहे, अशी माहिती नागोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, माजी नगरसेवक ईश्वरा खोत यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मागील दोन-तीन वर्षे पावसाअभावी शेतकरी वर्ग फार मोठ्या संकटात सापडला होता. मात्र, यंदाच्या वर्षीही पावसाने समाधानकारक हजेरी लावली नसली तरीही दुष्काळी परिस्थितीतीही आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे संभाळ केलेल्या जनावरांच्या मालकांसह शेतकरी वर्गाला जातीवंत खिलार जनावरांच्या यात्रेचे वेध लागले आहेत. नागोबा यात्रा 22 ते 28 डिसेंबर कालावधीत भरणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.22 रोजी देवाची सासनाची पूजा व आरती करून यात्रेस सुरूवात होणार आहे. 22 ते 23 रोजी शेळ्या-मेंढ्याचा बाजार भरणार आहे. दि 23 ते 27 या कालावधीमध्ये भव्य जातीवंत खिलार जनावरांची यात्रा भरणार आहे.

बुधवार, दि.25 रोजी नागोबा देवस्थान ट्रस्टच्यावतीने निकाली कुस्त्यांचे नियोजन केले आहे. आखाड्यात 51 हजारांची प्रथम क्रमांकाची कुस्ती ट्रस्टच्या वतीने लावण्यात आली आहे. द्वितीय क्रमांकाची कुस्ती 25 हजार 501 हजार रूपयांची नगरसेवक दिपक बनगर यांच्यातर्फे, तृतीय क्रमांकाची 25 हजारांची कुस्ती देवापूरचे सरपंच किसन रामचंद्र चव्हाण यांच्यातर्फे तर चतुर्थ क्रमांकाची 21 हजारांची किसन बाबा जठरे यांच्यातर्फे, पाचव्या क्रमांकाची कुस्ती 13 हजारांची बबन पडळकर यांच्यातर्फे, सहाव्या क्रमांकाची कुस्ती 11101 रूपयांची कै. खाशाबा धुळा दिडवाघ यांच्या स्मरणार्थ पोपट खाशाबा दिडवाघ यांच्या तर्फे, सातव्या क्रमांकाची कुस्ती 11 हजारांची कै. रघुनाथ बाबू यादव (सुतार)यांच्या स्मरणार्थ बाबा रघुनाथ यादव यांच्या तर्फे लावण्यात आल्या आहेत.

बुधवार दि. 26 ते 27 डिसेंबर या कालावधीमध्ये नागोबा देवाच्या प्रांगणामध्ये विविध गावांचा गजीनृत्य कार्यक्रम होणार आहे. गजीनृत्यामध्ये सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील सुमारे 50 गजीनृत्य संघ सहभागी होणार आहेत. याच कालावधीत रात्री धनगरी ओव्यांचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवार, दि. 27 रोजी महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे. 27 रोजी जातीवंत खिलार जनावरांची निवड व बक्षीस समारंभ होणार आहे.

देवाची पाकाळणी दि.28 डिसेंबर रोजी होणार असल्याचे ईश्वरा खोत यांनी सांगितले. यावेळी किसन जठरे, मधुकर सरकारने, धर्मू खोत, तुळशीराम गोरड, तुकाराम विरकर, जिजाबा खोत, पांडुरंग विरकर (रोडके), शंकर विरकर (सर), रामा राखुंडे, अण्णा भोरे, बंडू विरकर, किसन ढम, वस्ताद विरकर, मंजाप्पा विरकर, आदीसह ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)