श्रीनगर – मुजफ्फराबाद कारवां ए अमन बस सेवा आजपासून सुरू

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर) – कारवां ए अमन ही बस सेवा आजपासून सुरू करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. जम्मू-काश्‍मीरची राजधानी श्रीनगर आणि पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरची राजधानी मुजफ्फरपूर या दरम्यान ही बस सेवा चालते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी श्रीनगरहून सुटलेली अमन ए कारवां बस अगोदर भारतीय सीमेवरील शेवटची चौकी असलेल्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथे जाणार आहे. तेथून आणखी प्रवासी घेतल्यानंतर ती मुजफ्फरपूरला रवाना होणार आहे. या बसमधून 18 काश्‍मिरी प्रवासी आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये जाणार आहेत. पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची नेमकी संख्या उरी येथून बस सुटल्यानंतरच समजू शकते.

अशाच प्रकारे पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमधून कारवां ए अमनमधून प्रवासी जम्मू-काश्‍मीमध्ये येतात. भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या करारानुसार हा प्रवास आंतरराष्ट्रीय पासपोर्टऐवजी प्रवासी परवान्याने (ट्रॅव्हल परमिट) करण्याची अनुमती देण्यात आलेली आहे. दोन्ही देशांच्या गुप्तचर विभागाच्या पडताळणीनंतरच प्रवाशांना हा प्रवास करण्याची परवानगी देण्यात येते. 7 एप्रिल 2005 रोजी कारवां ए अमन सेवा सुरू करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)