श्रीनगर मध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांची हत्या

श्रीनगर: नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांची आज गनिमांनी हत्या केली. त्यांनी केलेल्या गोळीबारात पक्षाचा एक पदाधिकारीही जखमी झाला असून त्याची प्रकृतीही गंभीर आहे. शहराच्या करफाली मोहल्ला भागात हा हल्ला झाला.

काश्‍मीरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचे मतदान केवळ तीन दिवसांवर आले असताना या हत्या झाल्याने राज्यात खळबळ माजली आहे. मुश्‍ताक अहमद वाणी आणि नाझीर अहमद भट अशी ठार झालेल्या दोन कार्यकर्त्यांची नावे आहेत. जखमी पदाधिकाऱ्याचे नाव अहमद गांजे असे आहे. गनिमांनी त्यांच्यावर गोळीबार करून तेथून पळ काढला. त्यांच्या शोधासाठी सर्वत्र पथके पाठवण्यात आली आहेत.

-Ads-

राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांनी या आधीच आपला बहिष्कार घोषित केला आहे. काश्‍मीरला घटनेच्या कलम 35 ए अंतर्गत देण्यात आलेल्या विशेष राज्याच्या दर्जाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांच्या विरोधात त्यांनी हा बहिष्कार घोषित केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)