श्रीनगर मधील तापमान आले शून्याच्या खाली

श्रीनगर – काश्‍मीर खोऱ्यात कडाक्‍याच्या थंडीला सुरूवात झाली असून काल रात्री प्रथमच यंदाच्या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद श्रीनगरला झाली. काल रात्री तेथील तापमान शून्याच्याही खाली गेले होते. तेथील ही नोंद उणे 2.2 इतकी होती. हे तापमान तेथील या दिवसांतील नॉर्मल तापमानाच्या पाच अंश खाली गेले आहे.

काश्‍मीर खोऱ्यात तसेच लडाख परिसरातही तापमान शून्याच्या खाली गेले आहे. उत्तर काश्‍मीरातील गुलमर्गला उणे 6.6 अंश सेल्सीयस इतके तापमान नोंदवले गेले आहे. तर अमरनाथ परिसरातील तापमान उणे 5.2 इतके झाले आहे. या राज्यातील अन्य भागातील तापमानाची नोंद पुढील प्रमाणे होती. काझीगंद उणे 2.8, कुपवाडा उणे 1.8 कोकेरनाग उणे 1.7. कारगील मधील तापमान सर्वात कमी म्हणजे उणे 9 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)