श्रीनगर कॉलनीमधील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात

सातारा- येथील सातारा-कोरेगाव मार्गावरील वेदभवन मंगल कार्यालयाशेजारी असणारी श्रीनगर कॉलनी ही खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणारी श्रीनगर 35 घरांची ही कॉलनी. या कॉलनीत अंदाजे 300 ते 400 नागरिकांची वसाहत आहे. हे नागरिक अनेक वर्षापासून सर्व मुलभुत सुविधापासुन वंचित आहेत.

या कॉलनीत आजपर्यंत डांबरी पक्के रस्ते, सांडपाण्यासाठी गटारे तसेच विद्युत खांबावर दिवे नाहीत. रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. सांडपाणी व नाल्याच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्यामुळे मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात झाड झुडपे गवत वाढले आहे. व सर्वसांडपाणी गटाराचे पाणी प्रत्येक नागरिकांच्या बोरमध्ये मिसळत आहे. या आधी या भागात दुषीत पाण्यामुळे अनेकांना गॅस्ट्रो सारख्या आजाराला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे या सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्या ठिकाणी राहणारी लहान मुले, स्त्रिया, वृद्ध वारंवार आजारी पडत असतात. चार पाच वर्षापुर्वी काळेश्वरी कॉलनीतील अशाच सांडपाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढल्याने एका लहान मुलीचा डेंग्युने मृत्यू झाला होता.

या सर्व समस्यांच्या संदर्भात श्रीनगरमधील नागरिकांनी खेड ग्रामपंचायतीमध्ये वारंवार तक्रारी अर्ज दिले होते. त्याची आजपर्यंत दखल घेतली नाही. त्या प्रभागातील सदस्यांनी तीन चार वेळा फक्‍त पहाणी करुन ते प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे फक्त आशवासन दिले प्रत्यक्षात मात्र काहीच कार्यवाही केली नाही. पंचायतीच्या स्वाधीन असलेल्या रस्त्यांचे नोंद पुस्तक ग्रामपंचायतीचा नमुना नं. 26 मध्ये नोंदवून व कायम स्वरुपी देखभाल दुरुस्तीसाठी सर्व नागरिकांनी स्वखुशीने ग्रामपंचायतीच्या ताब्यात देवूनही त्याचा काहीच उपयोग झाला नाही. श्रीनगरमधील सर्व नागरिकांना सर्व मुलभुत सुविधा न मिळ्याल्यामुळे घरपट्टी न भरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा व मतदान न करण्याचाही निर्णय घेतला आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी यापुर्वी अनेकवेळा पालकमंत्री, जिल्हा परिषद अधिकारी, पंचायत समिती सभापती, जिल्हाधिकारी ग्राहक न्यायालयात अर्ज तक्रारी दिल्या होत्या, पण काहीच कार्यवाही झालेली नाही.

प्रकाश गुरव यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना या प्रश्‍नांसंबंधीचा अर्ज देण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मुद्यांवर त्वरीत सविस्तर चौकशी करुन नियमानुसार तात्काळ योग्य ती कारवाई करुन श्रीनगरमधील नागरिकांना मुलभुत सुविधा मिळाव्यात याबाबतच्या सुचना देवून ही त्या आधिकाऱ्यांच्या सुचनांना केराची टोपली दाखविली.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)